जिल्हा

ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या सानिध्य एकाडेची सुवर्ण भरारी

ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या सानिध्य एकाडेची सुवर्ण भरारी
ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या सानिध्य एकाडेची सुवर्ण भरारी फोटो: ठाणे वैभव

दोन सुवर्णपदकांसह राज्य स्पर्धेत ठसा 

ठाणे: चंद्रपूर येथे १४ ते १९ ऑक्टोबरदरम्यान पार पडलेल्या योनेक्स-सनराईज महाराष्ट्र राज्य कनिष्ठ (१९ वर्षांखालील) बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या सानिध्य एकाडे याने दोन सुवर्णपदकांची कमाई करत उल्लेखनीय यश संपादन केले. मिश्र दुहेरी गट आणि मुलांच्या दुहेरी गटात विजेतेपद मिळवत सानिध्यने आपल्या खेळाचा दर्जा सिद्ध केला. त्याच्या या दुहेरी सुवर्णयशामुळे ठाण्याच्या बॅडमिंटन क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिश्र दुहेरी गटाच्या अंतिम सामन्यात सानिध्य एकाडे आणि युतिका चव्हाण या जोडीने आदित्य पूजारी आणि रुतिका कांबळे यांच्या जोडीवर १५-९, १५-९ अशी मात करत सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर मुलांच्या दुहेरी गटात सानिध्यने निधीश मोरे याच्या साथीने आणखी एक सुवर्णपदक जिंकले. या अंतिम सामन्यात सानिध्य आणि निधीश यांनी अभिक शर्मा आणि स्वरीत सातपुते यांच्या जोडीचा १०-१५, १५-७, १५-११ असा पराभव केला. एकाच स्पर्धेत दोन गटांत विजेतेपद मिळवण्याची सानिध्यची कामगिरी विशेष ठरली.

याच स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या मृणाल पोतदार हिने मुलींच्या दुहेरी गटात रौप्यपदक मिळवले. मृणाल पोतदार आणि मानसी मोहपात्रा या जोडीला अंतिम सामन्यात अनुष्का एप्टे आणि तन्वी घरपुरे यांच्या जोडीकडून १५-१३, १५-६ असा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे ठाणे अकादमीच्या शिरपेचात आणखी एका पदकाची भर पडली.

वैयक्तिक गटांतील या यशाबरोबरच ठाणे संघाने सांघिक स्पर्धेतही विजेतेपद पटकावून आपल्या कामगिरीवर यशाची मोहोर उमटवली. पुणे संघाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात ठाणे संघाने २-१ असा विजय मिळवत सांघिक विजेतेपदावर आपले नाव कोरले.

ठाणे संघात आर्यन बिराजदार, अर्जुन बिराजदार, सानिध्य एकाडे, अपूर्व दवडते, यश ढेंबरे आणि यश सिन्हा या खेळाडूंचा समावेश होता. संघासोबत अधिकारी म्हणून फुलचंद पासी आणि मितेश हजरनीस यांनी जबाबदारी सांभाळली. मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्यासह अक्षय देवळकर, कबीर कंझारकर , मयूर घाटणेकर, एकेंद्र दर्जी आणि जीत शिरोडकर यांचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475